विशेष प्रतिनिधी
देहू: महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. शूर वीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. धर्माचे रक्षण करणं जस आपलं कर्तव्य आहे. तसेच नद्या प्रदूषण मुक्त करण आपलं काम आहे. असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ( I will not even let the hair of the saints be shaken, said Eknath Shinde, this is my word)
एकनाथ शिंदे यांना देहू संस्थान कडून श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना तुकोबांच मार्गदर्शन होत. आशीर्वाद होता. देहूच्या पवित्र भूमीत छत्रपती शिवाजी महाराज हे संत तुकोबांच्या भेटीला आले होते. पुढे ते म्हणाले, संत तुकोबांच्या रचना आपल्या जगण्यावर भाष्य करतात. ३७५ वर्षानंतर ही त्या काल बाह्य झालेल्या नाहीत. पुढील ३७५ वर्ष च नव्हे तर ३,३७५ वर्ष या रंचनांमधील मधील अर्थ लोप पावणार नाहीत. तुकोबांनी चारशे वर्षांपूर्वी क्लिष्ट अस तत्वज्ञान हे सोप्या मराठीत सांगितलं. हाच मराठीचा अभिजात दर्जा होता. अस मत त्यांनी व्यक्त केलं. तुकाराम महाराजांच्या शिकवणी प्रमाणे आम्ही शांततेने काम करत आहोत. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काय- काय केलं हे सर्वांना परिचित आहे. ते माझं कर्तव्य होत. वारकऱ्यांपेक्षा कुणी मोठं नाही.
वारकरी हा समाज प्रबोधनकार आहे. तुम्ही एकदा मनावर घेतल की काय होऊ शकतं, हे तीन महिन्यांपूर्वी पाहिलं आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची भूमी आहे. महाराष्ट्रात संतांच्या केसाला ही धक्का लागू देणार नाही. हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे. धर्माच रक्षण करण आपल्या सर्वांच कर्तव्य आहे. त्याच प्रमाणे इंद्रायणी, चंद्रभागा, गोदावरी या नद्यांची रक्षण करणं आपली जबाबदारी आहे. नद्यांची परिस्थिती बरी नाही. प्रदूषण मुक्तीची लोक चळवळ झाली पाहिजे. आदर्श नद्या बनल्या पाहिजेत. अस मत ही शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.