विशेष प्रतिनिधी
मुंबई: महानगरपालिका निवडणुका येत आहेत. त्यामुळे एक आरोप केला, तो मागे पडला. त्यानंतर आता हा दुसरा आरोप करण्यात आला असल्याचा आरोप करत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियनच्या वडिलांचे आरोप राजकीय हेतूने केल्याचे म्हटले आहे.( Kishori Pednekar said that Disha Salian’s father’s allegations are being made because the municipal elections are coming up)
यावेळी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाची आत्महत्या किंवा अपघात नसून तिची हत्या झाली असल्याचा दावा मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. तसेच, आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमची दिशाभूल केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे.
पेडणेकर म्हणाल्या की, “दिशा सालियनच्या वडिलांनी काही आरोप करो. हे प्रकरण झाल्यानंतर मी उघड उघड त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमे देखील माझ्यासोबत होती. तिच्या पालकांसोबत माझी माध्यमांसमोर चर्चा झाली होती. त्यांची पत्नी वेगवेगळ्या चटण्या बनवते. यावरूनही त्यांच्यासोबत चर्चा केली. या प्रकरणाशी आमचा दुरान्वये संबंध नाही. दिशा सालियनचे वडील हे महापौर बंगल्यावर आले होते, हे उघड आहे. त्यांनी महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती. मला वाटते, त्यांनी लेखी दिले होते. त्यांचे अनेकदा फोन आले होते.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिशा सालियन प्रकरणाचा नव्याने तपास करावा, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरदेखील गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. पण, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या दबावामुळे हे प्रकरण दाबण्यात आल्याचा आरोप आरोप त्यांनी केला आहे. मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून आपल्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप सदर याचिकेमध्ये करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले, तपासावेळी पुरावे खरे मानण्यात भाग पाडले. तसेच त्यावेळी मुंबई पोलसांनी दबाव टाकला असलायचा आरोपही दिशाच्या वडिलांनी केला आहे.