विशेष प्रतिनिधी
पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोड पथकाने सराईत आणि तडीपार गुन्हेगारांना अटक केली असून चार पिस्तुले आणि आठ काडातुसे जप्त करण्यात आली आहेत.
गोपाळ संजय यादव (वय २४), अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटेल (वय २३), इशाप्पा ऊर्फ विशाल जगन्नाथ पंदी (वय २४, सर्व रा. बाकोरी फाटा, वाघोली), देवानंद शिवाजी चव्हाण (वय २३, रा. मारुती आळी, शिरुर) अशी आरोपींची नावे आहेत. यातील यादववर दरोडा, खुनाचा प्रयत्न, दंगा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तर, पटेलवर अहमदनगर येथे तसेच लोणीकंद पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट व तडीपारीचे गुन्हे दाखल आहेत. पंदीवर मोक्काअंतर्गत करण्यात आली होती. त्याच्यावर दरोडा, आर्म अॅक्ट, तडीपार असे गुन्हे दाखल आहेत. तर, चव्हाणवर देखील गुन्हे दाखल आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर यांना खबऱ्यामार्फत आरोपीबाबत माहिती मिळाली होती. वाघोली येथील आलोवेरी सोसायटी, राजेश्वरी नगरी परिसरात एकाच घरात पटेल, पंदी, यादव राहत असून त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळालेली होती. पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला. फ्लॅटमध्ये छापा टाकून चारही आरोपींना ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता ४ पिस्तुले आणि ८ काडतुसे असा १ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. आरोपींना अटक करण्यात आली.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळीक, खंडणी विरोधी पथक २चे पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहायक फौजदार सुनिल पवार, पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर, चेतन आपटे, अजिनाथ येडे, अमोल घावटे, अमोल राउत, सैदोबा भोजराव, सुरेंद्र जगदाळे, चेतन चव्हाण, दिलीप गोरे, पवन भोसले, प्रशांत शिंदे, आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.