मुंबई : धारावीमध्ये सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाडीमध्ये अचानक आग लागली. आग लागल्यानंतर एकापाठोपाठ सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहे. ( Dharavi rocked by cylinder explosion)
धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर ही घटना घडली आहे. या रस्त्यावर सिलेंडरने भरलेला ट्रक उभा होता. रात्री अचानक या ट्रकला आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातचं सिलेंडरचे स्फोट सुरू झाले. अंदाजे १२ ते १३ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. सुदैवाने या घटनेमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.