विशेष प्रतिनिधी
मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा शो पाहणे प्रेक्षकांना चांगलेच महागात पडणार आहे.
मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराने ज्या शोमधून एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली त्या शोला उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांना समन्स बजावले आहेत. जे प्रेक्षक त्या दिवशी कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते त्यांचा पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे. ( Kunal Kamras show is expensive for viewers police summons them)
सीसीटीव्हीच्या मदतीने प्रेक्षकांची ओळख पटवून त्यांना जवाब नोंदवण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. पोलिसांनी सीआरपीसी कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसही पाठवली आहे. ज्यामध्ये पोलिस अधिकाऱ्यांना साक्षीदारांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. पोलिसांना शोमधील एक किंवा दोन उपस्थितांना साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्याचा अधिकार आहे.
कुणालच्या शोमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ठाणे का रिक्षावाला…गद्दार नजर वह आये असे विडंबनात्मक गाणे गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान केला. त्याचबरोबर हम होंगे कामयाब गाण्यावर ‘हम होंगे कंगाल, एक दिन मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश हम होंगे कंगाल, एक दिन होगे नंगे चारो और, करेंगे दंगे चारो ओर पोलिस के पंगे चारो ओर, एक दिन मन मै नत्थुराम, हरकते आसाराम हम होंगे कंगाल, एक दिन होगा गाय का प्रचार, लेके हाथो मे हत्थियार होगा संघ का शिष्टाचार, एक दिन जनता बेरोजगार, गरीबी की कागार हम होंगे कंगाल,…’ हे दुसरे गाणेही प्रदर्शित केले. कुणाल कामराविरोधात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा याला हजर राहण्यासाठी तीन समन्स पाठवले. मात्र तो हजर झाला नाही.