विशेष प्रतिनिधी
पुणे : गर्भवती महिलेच्या मृत्यप्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात विविध संघटना आक्रमक झालेल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाने या रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू केले आहे. शिंदे गटाने लोकांकडून चिल्लरची भीक मागून ती रुग्णालय प्रशासनाला देण्याचा निर्णय घेतला आहे. ( Both Shiv Senas protest against Dinanath Mangeshkar Hospital)
भाजपाचे विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नीचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 3 एप्रिल) घडली. पुण्यातील प्रसिद्ध अशा दीनानाथ मंगशेकर रुग्णालयाने केलेल्या आडमुठेपणामुळे महिलेला जीव गमवावा लागल्याचे बोलण्यात येत आहे. . ऑपरेशनसाठी तातडीने १० लाख रुपये द्या, अन्यथा आम्ही उपचार करणार नाही. जर पैसे देण्यास दमत नसेलतर तुम्ही तुमच्या रुग्णाला ससून रुग्णालयात घेऊन जा, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. यानंतर महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे तिने दोन बाळांना जन्म दिला. पण यानंतर मात्र त्या महिलेचा मृत्यू झाला. ज्यानंतर आक्रमक झालेल्या विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.