विशेष प्रतिनिधी
पुणे : शेअर मार्केट आणि ऑनलाईन गेमिंगच्या नादातून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणीने मैत्रिणीला कोल्ड कॉफीतून गुंगीचे औषध देऊन दागिन्यांवर डल्ला मारला.
( A young woman studying for MPSC became a thief after being adicted to stock market and online gaming knocked her friend unconscious and stole her jewelry.)
याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आंबेगाव पठार येथील २५ वर्षाच्या मैत्रिणीला अटक केली आहे. न्यायालयाने तिला ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता आंबेगाव येथील फिर्यादीच्या घरी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी
तरुणी या दोघी मैत्रिणी आहेत. आरोपी तरुणी ही मुळची लातूरची राहणारी तर फिर्यादी या पुण्यातीलच आहेत.विवाहापूर्वी त्या सदाशिव पेठेतील एका खोलीतअभ्यास करीत असत. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. फिर्यादी या एका अभ्यासक्रमाला प्रशिक्षणार्थी आरोपी तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. विवाहानंतर त्या आंबेगाव बुद्रुक व आंबेगाव पठार येथे रहायला आल्या.त्यातून त्यांचे एकमेकींच्या घरी जाणे येणे सुरु झाले.
आरोपी तरुणी ही ६ मार्च रोजी दुपारी ४ वाजता
फिर्यादीच्या घरी कोल्ड कॉफी घेऊन आली. फिर्यादीने
कॉफी पिल्यावर तिला गुंगी आली. त्यानंतर तिच्या घरातील कपाटातून ५ लाख ४६ रुपयांचे
दागिने चोरुन नेले. दोन दिवसांपूर्वी घरातील दागिने दिसत नसल्याने तिने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तपास करुन तिच्या मैत्रिणीला अटक केली आहे.