विशेष प्रतिनिधी
मुंबई : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात २६ निरपराध हिंदू पर्यटकांचे बळी गेल्याने देशभरात शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर – खान दुबईत पाकिस्तानी डिझायनर फराझ माननसोबत मौजमजा करताना दिसल्याने ती प्रचंड वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ( Kareena Kapoor celebrates with Pakistani designer after Pahalgam terror attack Social media outraged as traitor)
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप हिंदू पर्यटकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. केंद्र सरकारने देशातील सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतातून हाकलून देण्यास सुरुवात केली.
मात्र, २७ एप्रिल रोजी फराझ माननने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर करीनासोबतचा फोटो शेअर केला. “With the OG” असे कॅप्शन देत त्यांनी दुबईतल्या एका जेवणानंतरचे क्षण टिपले. हा फोटो व्हायरल होताच देशभरातून करीनावर संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर “गद्दार”, “देशद्रोही” अशा जोरदार शब्दांत तिच्यावर टीका सुरू आहे.
करीना कपूरची फराझ माननसोबत जुनी व्यावसायिक मैत्री आहे. माननचे दुबईत स्वतःचे स्टोअर असून तो मूळचा पाकिस्तानचा नागरिक आहे. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातलेली असतानाही करीनाचा असा वावर भारतीय जनतेच्या भावना दुखावणारा ठरत आहे, असा सूर सध्या सोशल मीडियावर आहे.
फक्त करीना कपूरच नाही, तर कियारा अडवाणी, अदिती राव हैदरी, तारा सुतारिया, नीतू कपूर, सोनम कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर, महीप कपूर, कार्तिक आर्यन, पुलकित सम्राट आणि आदर जैन यांसारखे अनेक बॉलिवूड कलाकार फराझ माननला सोशल मीडियावर फॉलो करतात. फराझने यापूर्वी दीपिका पदुकोण, रणबीर कपूर आणि अनन्या पांडे यांच्यासोबतही काम केले आहे.
देशावर हल्ला करणाऱ्या देशाशी संबंध ठेवणाऱ्या कलाकारांना आपण स्टार म्हणून डोक्यावर घ्यावे का? अशा संतप्त प्रश्नांची झड सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.