विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिकेने (PMC) ५ मेपासून वडगाव पाणी शुद्धीकरण केंद्रातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात टप्प्याटप्प्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रत्येक भागात आठवड्यातून एक दिवस पूर्णतः पाणी बंद राहणार आहे. ( Pune to face water shortage in phases from May 5)
कपातीचा फटका बसणारे प्रमुख परिसर: धायरी, सनसिटी, वडगाव बुद्रुक, हिंगणे, सहकारनगर, धनकवडी, बालाजीनगर, अंबेगाव पठार, दत्तानगर, संतोष नगर, भारती विद्यापीठ परिसर, आगम मंदिर, कात्रज आणि कोंढवा बुद्रुक.
५ मे (सोमवार):
बालाजीनगर: श्रीहरी सोसायटी, गुरुदत्त सोसायटी, निवारा सोसायटी, साईकृपा, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पिटल शेजारील परिसर.
कात्रज: उत्कर्ष सोसायटी, गुजरवस्ती, कात्रज तलाव (पूर्व बाजू), चौधरी गोठे परिसर.
कोंढवा बुद्रुक: साईनगर, गजानन महाराज नगर, शांतिनगर, महानंदा सोसायटी, श्रीकृष्ण कॉलनी, सावंत कॉलनी.
६ मे (मंगळवार):
धायरी व सनसिटी: उज्वल टेरेस, डाळीववाडी, वरंगणी मळा, पारे कंपनी रोड, संपूर्ण सनसिटी, माणिकबाग, समर्थनगर, महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हॉस्पिटल परिसर, विठ्ठलवाडी, विठ्ठलनगर.
कात्रज: राजस सोसायटी, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, नवीन पोस्ट ऑफिस परिसर.
कोंढवा बुद्रुक: कामठे पाटीलनगर, खडीमशीन चौक, सिंहगड कॉलेज परिसर, हाऊ टाउन सोसायटी, कोल्टे पाटील सोसायटी (वॉर्ड ३७).
७ मे (बुधवार):
वडगाव बुद्रुक: वडगाव हायवे परिसर, पेरू बाग, धाबडी, जाधव नगर, वडगाव गावठाण, खुरड वस्ती, सुदत्त संकुल, समर्थनगर.
हिंगणे व आनंदनगर: संतोष हॉल परिसर, महादेव नगर, आनंद विहार, राजीव गांधी वसाहत.
कात्रज: वाघजाई नगर, भांडे आळी, सुखदा वरदा सोसायटी, सम्राट टॉवर, अंबामाता मंदिरमागील परिसर.