विशेष प्रतिनिधी
चौंडी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचे जन्मगाव चौंडीचा तीर्थस्थळ म्हणून विकास करण्यात येणार आहे. अहिल्यादेवी त्रिशताब्दी निमित्त एका लोगोचे व एका टपाल तिकीटाचेही प्रकाशन केले आहे. याशिवाय अहिल्यादेवी यांचे एक प्रेरणा गीत देखील जारी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ( Ahilya Devis birthplaceChaundi will be developed as a pilgrimage site the Chief Minister announced.)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीवर्षानिमित्त अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यात 681 कोटींच्या विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. राज्यातील एकूण 5503 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी यशवंत विद्यार्थी योजना राबवण्यात येणार आहे. धनगर समाजातील 10 हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह निर्मिती करणार आहे.
विविध मंदिरांच्या विकासासाठी 5530 कोटींचा आराखड्यास बैठकीत मान्यता दिला. अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथे विकासासाठी 681 कोटींच्या विकास आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे. अष्टविनायक गणपती मंदिराचा जिर्णोधार करण्यासाठी 147 कोटी रुपये निधी मंजूर आला आहे. श्रीक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर विकास आराखडा 865 कोटी रुपये, श्रीक्षेत्र ज्योतिबा मंदिर विकास आराखडा 259 कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर विकास आराखडा 275 कोटी रुपये, श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा 1445 कोटी रुपये, श्रीक्षेत्र माहूर गड विकास आराखडा 829 कोटी रुपये अशा एकूण 5503 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आला आहे.