विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला माेठा दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडली आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे एफ-16 पाडलं आहे. याशिवाय पाकिस्तानची JF-17 ही दोन लढाऊ विमानेही पाडण्यात आली आहेत. भारताने आमची चिनी बनावटीची दोन जेएफ-17 पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (India hits PakistanPakistani officials admit to shooting down three fighter jets)
भारतानं एअर डिफेन्स सिस्टीमकडून विविध ठिकाणी करण्यात आलेले ड्रोन हल्लेही परतवून लावण्यात आले आहेत. भारताची एअर डिफेन्स सिस्टीम एस-400 नं पाकिस्तानचं लढाऊ विमान जेएफ-16 पाडण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या एका लष्करी अधिकाऱ्यानं पाकिस्तानची दोन विमानं पाडली गेल्याची कबुली दिली आहे. भारतानं राजस्थानमध्ये एफ-16 विमान पाडलं आहे. पाकिस्तानची जी विमान भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करतील ती पाडली जातील.
भारतानं पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल, मोर्टार अटॅक, हवाई अटॅक परतवून लावला आहे. भारतीय सैन्याकडून पाकचे हल्ले परतवून लावण्यात आले आहेत. भारताकडून देखील पाकिस्तानच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याची माहिती आहे.
भारतानं सतर्कतेचा भाग म्हणून विविध ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आले आहेत. श्रीनगर विमानतळावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतानं जम्मू,श्रीनगर, पठाणकोट, जैसलमेर या ठिकाणी पाकचे हल्ल्याचे प्रयत्न परतवून लावले आहे.
दरम्यान, पाकिस्तान करण्यात आलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. भारतानं चंदीगडमध्ये देखील ब्लॅक आऊट जारी केला आहे. श्रीनगरच्या काही भागांमध्ये सायरन वाजवण्यात येत असून एअर डिफेन्स सिस्टीम सक्रीय करण्यात आली आहे.