विशेष प्रतिनिधी
पुणे: दुसऱ्यासोबत अनैतिक
असल्याच्या संशयातून प्रेयसीचा
गळा दाबून खून केला. याप्रकरणी प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
( Woman murdered by boyfriend over suspicion of having an immoral relationship)
कमल उर्फ अनिता लोंढे (वय २७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत तिचा आधीचा पती विक्रम विश्वास लोंढे (वय ३७, रा. भेकराई नगर, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल शिवाजी मिसाळ (वय ३२, रा. रायकर मळा, यवत, ता. दौंड, मुळ रा. माळशिरस, जि. सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, कमल हिचे याआधी लग्न मोडले होते. ती आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. मागील दोन वर्षांपासून आरोपी राहुल आणि कमल एकत्र राहत होते. कमल ही राहुल याच्या मामाची मुलगी होती. १८ मे पासून दोघे जण शेवाळवाडी येथे राहण्यास आले होते. राहुल याला कमल हिचे दुसऱ्या व्यक्तिसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या कारणातून त्याने शुक्रवारी (२३ ) तिचा राहत्या घरी चिडून गळा आवळून खून केला.
अनिताचा खून केल्यानंतर आरोपी राहुल हा स्वतःहून यवत पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने अनिता हिचा शेवाळवाडी येथील राहत्या घरी खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर यवत पोलिसांनी याबाबत हडपसर पोलिसांना कळविले. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांना घटनास्थळी अनिताचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवून दिला. त्यानंतर हडपसर पोलिसांच्या एका पथकाने यवत येथून आरोपी राहुल याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.