अहमदाबाद | १२ जून २०२५:
अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एअर इंडिया फ्लाइट AI171 (Boeing 787-8 Dreamliner) आज दुपारी टेकऑफनंतर काही सेकंदातच मेघानीनगर परिसरात कोसळले. (Severe Air India Plane Crash in Ahmedabad – Around 242 Passengers Onboard)
या विमानात सुमारे २४२ प्रवासी आणि कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमानाचा काही भाग जवळील इमारतीवर कोसळला असून, अपघातस्थळी घनदाट धुराचे लोट दिसून आले.
फायर ब्रिगेड, पोलिस, अँब्युलन्स आणि NDRF पथक घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य वेगाने सुरू आहे. अद्याप कोणताही अधिकृत मृत्यू किंवा जखमींचा आकडा जाहीर करण्यात आलेला नाही.
अहमदाबाद विमान अपघातात विजय रूपाणी हेही यात प्रवास करत होते?
विजय रूपाणी या विमानात प्रवास करत होते, ज्याची Gujarat BJP आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकारी म्हणुन प्राथमिक पुष्टी केली आहे
या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून, DGCA, एअर इंडिया आणि बोईंगचे तांत्रिक तज्ज्ञ क्रॅशच्या कारणांचा शोध घेत आहेत. काळी पेटी (ब्लॅक बॉक्स) शोधण्याचे काम सुरू झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, केंद्र व राज्य प्रशासनात समन्वयाने बचावकार्य सुरू आहे.