विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे एआय 171 हे विमान कोसळले. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात सर्वच 244 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. हे दुःख शब्दात सांगता येणारे नाही, असे मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ( This grief cannot be expressed in words Prime Minister Narendra Modi expressed his condolences on the Ahmedabad plane crash)
या विमानातून प्रवास करणारे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा सुद्धा या अपघातात मृत्यू झाला असल्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अहमदाबादरमध्ये झालेला विमान अपघात ही मोठी दुर्घटना आहे. अहमदाबाद येथील दुर्घटनेने मला धक्का दिला आहे आणि दु:खी केले आहे. हे दु:ख शब्दांत सांगता येणारे नाही. या दु:खद घटनेत, माझ्या भावना या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकासोबत आहेत. प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे.
DGCAने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बी 787 ड्रीमलायनर AI 171 या विमानाने दुपारी 1.38 वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ घेतल्यावर अवघ्या पाच मिनिटांतच कोसळले. या विमानात दोन लहान मुलांसह 230 नागरिक, दोन पायलट आणि 10 क्रू मेंबर्स असे 244 प्रवासी होते. या विमानाचे सुमीत सभरवाल हे पायलट इन कमांड आणि क्लाइव्ह कुंदर हे सह-पायलट होते. विमानातील प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 7 पोर्तुगीज आणि एक कॅनडाचा नागरिक होता. परिसरातीली बी जे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर विमानाचे अवशेष पडल्याने तिथेही काही विद्यार्थी जखमी झाल्याचे सांगण्यात येते. पण अद्यापही या अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला आहे, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.