विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य महिला अजिंक्यपद व महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धसाठी हिंदकेसरी आखाडा वारजे येथे झालेल्या पुणे शहर संघ निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी महिला महाराष्ट्र केसरी गटासाठी सिध्दी होलकची निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सरचिटणीस व राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त हिंदकेसरी पै योगेशभाऊ दोडके व राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त अध्यक्ष श्री तात्यासाहेब भिंताडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या वेळी संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री जयसिंगआण्णा पवार उपाध्यक्ष श्री अविनाश टकले, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मांगडे, सहसचिव श्री योगेश पवार सभासद ॲड पै संग्राम बालवडकर आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच श्री रोहीदास आमलेसर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
हि स्पर्धा वर्धा येथे होणार आहे. निवड चाचणी स्पर्धेतील विजेत्या महिला खेळांडूना राष्ट्रिय तालीम संघाच्या वतीने सरचिटणीस श्री शिवाजीराव बुचडे यांनी शुभेच्छा दिल्या, तसेच महिला तांत्रिक समन्वयक संध्या पानबुडे मॅडम यांनी राज्य स्पर्धेबाबत खेळाडूंना सविस्तर ,महत्वाच्या सूचना दिल्या.
– पुढीलप्रमाणे :-
* 50 किलो -सायली नारायण जगताप; 53 किलो -ज्ञानेश्वरी गणेश पायगुडे; 55 किलो -सिध्दी दत्तात्रय ढमढेरे; 57 किलो -आर्या बाबासाहेब बाणेकर; 59 किलो -भुमी अंकुश हाळंदे; 62 किलो -किर्ती भरत पवार; 65 किलो -प्रतिक्षा दत्तात्रय सुतार; 68 किलो-सीमा सुभाष वर्मन; 72 किलो -श्वेता शत्रुघ्न ववले; महिला महाराष्ट्र केसरी किताब वजनगट.-सिध्दी अनिल होलकर
न्यूझीलंडचा ऐतिहासिक विक्रम: एका टेस्ट डावात तीन फलंदाजांचे १५०+ धावा; ९५ वर्षांत पहिल्यांदाच अशी कामगिरी (New Zealand’s Historic Feat: Three Batters Score 150+ in a Single Test Innings...
Read moreDetails