विशेष प्रतिनिधी
मुंबई : अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. ( Tata Group provides Rs 1 crore each to the heirs of those killed in the plane crash Will bear the expenses of the injured will also build a hostel)
अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने एक प्रवासी बचावला आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने
विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.
टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केलं. ”एअर इंडिया फ्लाइट 171 मधील दुःखद घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. आमच्या दु:खद भावना शब्दात व्यक्त न करता येणाऱ्या आहेत. विमान दुर्घटनेत ज्या कुटुंबीयांनी आपले प्रियजन गमावले आहेत, आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यासोबत आमच्या सहवेदान आणि प्रार्थना आहेत. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला (वारसांना) टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्चही आणि त्यांना आवश्यक ती सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन टाटा ग्रुपकडून देण्यात आले आहे. तसेच, विमान दुर्घटनेमुळे इमारत कोसळलेल्या बी.जे. मेडिकलच्या वसतिगृहाची नव्यानी उभारणी करण्यातही टाटा ग्रुप पुढाकार घेईन,” असे टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी जाहीर केले.
एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचे असल्याने आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठवण्यात येणार आहे. एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात तपासासाठी बोईंगकडून टीम येणार असल्याची माहिती टाटाकडून देण्यात आली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा केली. दुर्घटनेचे नेमकं कारण काय आहे? याच्या तपासासाठी जीई एरोस्पेस देखील तपासात मदत करण्यासाठी टीम पाठवणार आहे.