विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : अबू आझमींना वारकरी संप्रदायाची खरी माहितीच नाही. वारी ही वर्षातून एकदाच होते, तर नमाज दिवसातून पाच वेळा, अशा शांती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना सुनावले आहे.
( Hasan Mushrif slam Abu Azmi who made controversial statements on Wari)
पालख्यांमुळे रस्ता जाम होतो. हिंदूचे अनेक सण रस्त्यावर साजरे केले जातात. मात्र अशावेळी मुस्लिम समाज हिंदू सणांविरोधात तक्रार करत नाही. मात्र मुस्लिम समाज दहा मिनिटासाठी रस्त्यावर नमाज पठण केलं तरी तक्रारी केल्या जातात, असं वक्तव्य अबू आझमी यांनी केलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्याचे पासपोर्ट रद्द करण्याची धमकी दिली आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
अबू आझमी म्हणाले, नमाज अशा जागी पढली पाहिजे की इतरांना त्रास होऊ नये. वारीसाठी सरकारने नवीन पालखी मार्ग तयार केले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांविषयी गैरसमज पसरवू नये, असं अबू आझमी भेटले तर नीट समजावून सांगेन.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आझमींच्या विधानाला भाजपप्रेरित असल्याचा आरोप केला आहे.