विशेष प्रतिनिधी
जुन्नर: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी परिसरात ४० वर्षीय तलाठी आणि २० वर्षांची एक कॉलेज तरुणी मृतावस्थेत आढळली आहे. दोघांचे मृतदेह १२०० फूट खोल दरीत आढळले आहे. मृत्यूपूर्वी दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरात लावलेली कार आणि त्याच परिसरात आढळलेल्या चपलांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (A 40-year-old Talathi and a 20-year-old college girl were found dead in a deep valley.)
रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) आणि रूपाली संतोष खुटाण (वय अंदाजे 20) असं मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. रामचंद्र हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होते. रुपाली ही आंबोली येथील महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. दोघांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दोघे मागील काही दिवसांपासून बेपत्ता होते. याप्रकरणी रामचंद्र पारधी यांच्या पत्नीने तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, रूपालीच्या अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलीस ठाण्यात दाखल होता.
दोन वेगवेगळ्या एफआयआरमुळे दोन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस स्वतंत्र्यपणे तपास करत होते. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील दर्गावाडी परिसरातील कोकणकड्याजवळ दोघांचे मृतदेह आढळले आहेत. रिव्हर्स वॉटरफॉलजवळ उभी असलेली पांढऱ्या रंगाची कार आणि कड्याजवळ आढळलेल्या चपलांमुळे संशय बळावला होता. यामुळे रविवारी ( शोध मोहीम सुरू झाली. मात्र खराब हवामानामुळे शोधमोहीम थांबवावी लागली.
पत्नीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे तिने आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही, असा आरोप चिठ्ठीत केला आहे. पत्नीने आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या बदनामीमुळे जगण्याची इच्छा नाही. माझ्या मृत्यूस सर्वांना जबाबदार धरून कठोर कारवाई करा, असंही रामचंद्र पारधी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं. या नोटमध्ये त्यांनी आई वडील, बहीण-भाऊ आणि मुलांची माफी मागितली आहे.