विशेष प्रतिनिधी
पुणे: बाजीराव रस्त्यावरील सराफ दुकानातून चोरट्यांनी चार लाख ७४ हजारांचे दागिने तसेच रोकड चोरून नेली.
याबाबत रितेश रतनलाल पिचा (वय ४४, रा. मार्केटयार्ड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
( A jewelers shop on Bajirao Road was broken intojewellery worth Rs. 5.5 lakhs was looted.)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे बुधवार पेठेत बाजीराव रस्त्यावर नुतन मराठी विद्यालय शाळेजवळ आर जे ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान आहे. रविवारी (दि.६) पहाटे १२.५० ते १.२० वाजेच्या दरम्यान अनोळखी चोरटा दुकानात शिरला. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील शौचालयाच्या खिडकीतून त्याने आत प्रवेश केला. चोरट्याचे वय साधारण २० ते २५ वर्षे असावे. त्याने दुकानात शिरून चार लाख ७४ हजारांचे सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेले.
दुकानात चोरी झाल्याचे समजताच तक्रारदार यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.