विशेष प्रतिनिधी
मुंबई : आम्ही त्यांच्यासारखे बुटचाटे नाही. जे बोलत आहेत ते डरपोक आहेत, अशी जहरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे. गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर केली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हटवण्यात यावे, असा ठराव शिंदेंच्या शिवसेनेनं सोमवारी झालेल्या बैठकीत केला आहे. हा ठराव सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला आहे. शिंदे गटाच्या मागणीवर टीकाही त्यांच्या सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्राला माहिती आहे. दिल्लीचे बुट चाटणे हे त्यांचे काम आहे. महाराष्ट्र खड्ड्यांत घालणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणं जर मोठं कार्य असेल तर शिंदे गट ते करत आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत आमचे काय संबंध होते, हे यांनी समजून घेतले पाहिजे. आता जे पाळलेले पोपट फडफड करत आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची शकले उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केले आहे.
शरद पवार भेटीवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शरद पवार आणि मी भेटलो यात नवीन काही नाही. महाराष्ट्रात लोकांनी एकमेकांना भेटत राहिले पाहिजे,” असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत कोणतीही कटुता नसल्याचे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. “कटुता ही सत्ताधारी पक्षामध्ये आहे. शरद पवार आणि आमच्यात चर्चा झाली असून, आज ते पत्रकार परिषद घेत आहेत, त्यावर लक्ष ठेवा,” असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, “फडणवीस म्हणतात, आम्ही कोणालाही सोडणार नाही. पण, कराड यांना सोडून ते नक्की कोणाला वाचवत आहेत? अजित पवार की वाल्मीक कराड? यासाठी त्यांनी नवीन SIT नेमली आहे.”
राम मंदिराच्या प्रश्नावर मोहन भागवत यांना टोला लगावत राऊत म्हणाले, “राम लल्ला RSS ने आणला नाही देशात. प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे. मात्र, आज देशाचा कोंडवाडा झाला आहे.”
नितेश राणेंवरही टीका करताना ते म्हणाले, “ज्यांच्या मनात देशाच्या संविधानाचा आदर नाही, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. हे बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदाच बोलले होते.”
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails