पुणे –
श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ४,००० हून अधिक पोलिस रस्त्यांवर तैनात असणार असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थेतही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक शाखेने १६ आणि १७ ऑगस्टदरम्यान विविध मार्गांवर वाहतूक वळवली असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, टिळक रोड आदी ठिकाणी दहीहंडी फुटेपर्यंत गर्दीचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि कुठेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी बदल करण्यात आले आहेत.
बंदोबस्ताचा आढावा:
- पोलिस उपायुक्त – १०
- सहायक पोलिस आयुक्त – १६
- पोलिस निरीक्षक – ८०
- पोलिस उपनिरीक्षक व सहाय्यक निरीक्षक – ३५०
- पोलिस अंमलदार – ३५००
हा बंदोबस्त पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार तैनात केला जाणार आहे.
पुण्यात श्रीकृष्ण जयंती व दहीहंडी उत्सवासाठी पोलिसांचा सखोल बंदोबस्त; वाहतुकीत मोठे बदल #Pune #KrishnaJanmashtami #DahiHandi #PuneTrafficUpdate #GaneshRoad #LaxmiRoad #TilakRoad #ShivajiRoad #PuneUpdates #पुणे #कृष्णजन्माष्टमी #दहीहंडी #दहीहंडीउत्सव #श्रीकृष्णजयंती #पुणेपोलीस pic.twitter.com/Ln7MWa82gq
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) August 15, 2025
वाहतूक बदलाची माहिती:
फरासखाना व विश्रामबाग वाहतूक विभाग:
१६ ऑगस्ट, शनिवार – दुपारी ४ नंतर गर्दी संपेपर्यंत
- शिवाजी रोड → स्वारगेट
→ स. गो. बर्वे चौक → जंगली महाराज रोड → खंडोजी बाबा चौक → टिळक चौक/शास्त्री रोड - पुरम चौक → शिवाजीनगर
→ टिळक रोड → अलका टॉकीज चौक → एफ.सी. रोड
→ सणस पुतळा चौक → सेनादत्त चौक → पुढे - स. गो. बर्वे चौक → मनपा भवन
→ जंगली महाराज रोड → झाशी राणी चौक → डावीकडे वळून - बुधवार चौक → आप्पा बळवंत चौक (फक्त एकेरी वाहतूक)
→ परतीसाठी बाजीराव रोड वापरावा - रामेश्वर चौक → शनिपार चौक
→ वाहतूक बंद, पर्यायी मार्ग वापरावा - सोन्या मारुती चौक → लक्ष्मी रोड (सेवासदन चौक दिशेने)
→ वाहतूक बंद, उजवीकडे फडके हौद चौक मार्गे जावे - शिवाजी रोड → दारुवाला पूल
→ गाडगीळ पुतळा → कुंभारवेस चौक → जुनी साततोटी पोलिस चौकी - दारुवाला पूल, देवजीबाबा चौक, फडके हौद चौक
→ वाहतूक बंद, अपोलो टॉकीज, नरपतगिरी चौक, दुधभट्टी मार्ग वापरावा - सोन्या मारुती चौक → मोती चौक/फडके हौद चौक
→ विजय मारुती चौक → पासोडा विठोबा मंदिर → मोती चौक → फडके हौद
बंडगार्डन वाहतूक विभाग:
- तीन तोफा चौक → ब्ल्यू नाईल चौक (ईस्कॉन मंदिर)
→ वाहतूक बंद
→ पर्यायी मार्ग: ब्ल्यू नाईल चौक → तीन तोफा चौक (दुतर्फा वाहतूक)
कोंढवा वाहतूक विभाग:
१५ ऑगस्ट सकाळी ९ ते १६ ऑगस्ट मध्यरात्री १२
- गगनउन्नती चौक
→ यू टर्न बंद - केसर लॉज जवळील यू टर्न
→ बंद - खडीमशिन चौकी → श्रीराम चौक
→ वाहतूक बंद - → पर्यायी मार्ग:
खडीमशिन चौक → यू टर्न → इस्कॉन पार्किंग → अन्य मार्ग
(जड वाहने: मंतरवाडी फाटा → कात्रज दरम्यान आवश्यकतेनुसार बंद)
वानवडी वाहतूक विभाग:
- शिवरकर रोड → वाहतूक बंद
→ पर्यायी मार्ग: संविधान चौक → डावीकडे → सनग्रेस स्कूल → साळुंखे विहार - संविधान चौक → उजवीकडे (फ्लॉवर व्हॅली)
→ केदारी पेट्रोल पंप मार्गे पुढे - साळुंखे विहार रोड → संविधान चौक
→ उजवीकडे वळून फ्लॉवर व्हॅली → केदारी पेट्रोल पंप