नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६व्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला. कौन्सिलने ५% आणि १८% अशी दोन पातळीची दररचना तसेच ४०% कराचा प्रस्ताव मंजूर केला असून त्याची अंमलबजावणी २२ सप्टेंबरपासून होणार आहे. (Big GST Council Decision! Two-tier rate structure of 5% and 18% approved, to be implemented from September 22.)
मुख्य निर्णय
- टीव्ही सेट्सवर १८% कर लागू होणार.
- कर्करोगावरील जीवनरक्षक औषधांवर कर शून्य टक्के (nil rate).
- सिगारेट, पान मसाला यांसारख्या sin goods वर ४०% कर आकारला जाणार.
- तंबाखू व संबंधित उत्पादनांवर क्षतिपूर्ती उपकर (compensation cess) कर्ज फेडेपर्यंत सुरू राहणार.
- Paneer, चपाती, रोटी, पराठा यांवर जीएसटी पूर्णपणे शून्य.
- नमकीन, सॉस, पास्ता, चॉकलेट, तूप यांवर कर १२ किंवा १८% वरून घटवून ५% वर.
- सर्व ऑटो पार्ट्स आणि तीनचाकी वाहनांवर १८% कर.
- सिमेंटवर २८% वरून १८% कर.
जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय! ५% आणि १८% दर रचना मंजूर, २२ सप्टेंबरपासून अंमलबजावणी #जीएसटी #निर्मलासीतारामन #जीएसटीकौन्सिल #करकपात #आर्थिकबातमी #ताजाबातमी #अर्थव्यवस्था #महसूल #GST #NirmalaSitharaman #GSTCouncil #TaxCuts #ConsumerGoods #Economy #Revenue #BreakingNews pic.twitter.com/nmcwi5diFt
— DCN Maharashtra (@DCNMaharashtra) September 3, 2025
या नव्या कररचनेत साबणांपासून छोट्या गाड्यांपर्यंत अनेक ग्राहक वस्तूंवरील कर कपात करण्यात आली आहे. यामुळे देशांतर्गत मागणी वाढवण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
पश्चिम बंगालच्या वित्तमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी सांगितले की, या निर्णयामुळे ४७,७०० कोटी रुपयांचे महसूल नुकसान अपेक्षित आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी स्पष्ट केले की हा निर्णय सर्व राज्यांच्या एकमताने घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी सांगितले की, अपायकारक (demerit) वस्तूंवरील कराचा अंतिम निर्णय नंतर घेण्यात येईल.
या १०.५ तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत केंद्र आणि राज्यांनी महत्त्वाच्या करप्रस्तावांवर चर्चा केली.