[9:38 am, 16/1/2025] Harshu: विशेष प्रतिनिधी
नाशिक : नाशिकमध्ये काँग्रेसला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील या काँग्रेस पक्ष सोडणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या काँग्रेसवर नाराज आहेत. “मी काँग्रेस पक्षात नाराज असून माझी काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा नाही”, असे डॉ.हेमलता पाटील यांनी म्हटले आहे.
डॉ.हेमलता पाटील म्हणाल्या, गेल्या ३० वर्षांपासून मी नाशिक महापालिकेत काँग्रेसची नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. तसेच प्रदेशाचं प्रवक्ते म्हणूनही मी काम करत आहे. १९९६ मध्ये मला जेव्हा इच्छा नव्हती तेव्हा महापौर पदासाठी मला गळ घातली. मात्र, तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि काँग्रेसच्या एका मतामुळे माझं महापौर पद हुकलं. त्यानंतर महिलांसाठी आरक्षण होतं तेव्हाही मला संधी मिळाली नाही. तरीही मी पक्षावर कोणताही राग न धरता पक्षाचे काम करत राहिले. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत माझी इच्छा नसताना मला निवडणूक लढवायला सांगितलं. तेव्हा मला ५० हजार मते मिळाली. त्यानंतर आता यावेळी विधानसभेची निवडणूक मला लढवायची होती. काँग्रेसच्या नेतृत्वाकडूनही सांगण्यात आलं होतं की आम्ही ही जागा सोडणार नाही. मात्र, नंतर ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. त्यामुळे मला फसवलं गेल्याची भावना निर्माण झाली.
“मी काँग्रेस पक्षात नाराज आहे. तसेच माझी काँग्रेस पक्षात राहण्याची इच्छा नाही. एवढे वर्ष काम करूनही आपण जर लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, जर पक्ष आपल्याला नेहमी गृहीत धरत असेल तर मग त्या पक्षात कशाला राहायचं? आता ज्या पक्षाला असं वाटेल की मी कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेन आणि जो पक्ष मला काम करण्याची संधी देईल, त्या पक्षात मी प्रवेश करणार आहे. मात्र, मी आधी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे.
2019महापालिकेतील कॉँग्रेस पक्षाच्या गटनेतापदी शाहू खैरे यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. हेमलता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली होती. मात्र 2024 विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत ‘नाशिक मध्य’ जागेवरून तिढा निर्माण झाला. मागील वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसऐवजी जागा वाटपात ती आपल्याकडे खेचून घेण्यात शिवसेना (उध्दव ठाकरे) यशस्वी झाली . या जागेसाठी पक्षाने माजी आमदार वसंत गिते यांना एबी अर्ज दिल्यानंतर काँग्रेसच्या इच्छुक डॉ. हेमलता पाटील यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्यांनी बंडखोरी केली नाही.
[9:38 am, 16/1/2025] Harshu: