[9:24 am, 17/1/2025] Harshu: विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना भेट दिली असून आठवा वेतन आयोगाच्या गठणाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. लवकरच वेतन आयोग गठीत केला जाण्याची शक्यता आहे.
सातवा वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला होता, तेव्हा लेव्हल वनचे कर्मचारी चपराशी, सफाई कामगार यासारख्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन 18,000 रुपयांवर पोहोचलं होतं. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचं बेसिक वेतन 21,300 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे
.लेव्हेल 2 चे जे कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा 19,900 इतकं होतं ते आता 23,880 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. लेव्हल तीनच्या कर्मचाऱ्याच बेसिक वेतन 21,700 वरून 26,040 रुपये, लेव्हल चारच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन 25,500 वरून 30,600 वर तर लेव्हल पाचच्या कर्मचाऱ्याचं वेतन 29,200 वरून 35,040 वर पोहोचण्याची शक्यता आहे.
आता नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.अजून आठवा वेतन आयोग गठीत करण्यात आलेला नाही,किंवा त्याबाबतचं चित्र देखील पुरेस स्पष्ट नाही.
मात्र आता लवकरच त्याबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ मिळणार आहे, चपराशापासून ते आयएएस अधिकाऱ्यापर्यंत पगारात मोठी वाढ होणार आहे.
आठव्या वेतन आयोगाबाबत अजून कोणतंही चित्र स्पष्ट नाही. मात्र सातव्या वेतन आयोगातील तरतुदीवरून आठव्या वेतन आयोगाचा अंदाज लावला जाऊ शकतो.
[9:25 am, 17/1/2025] Harshu: