विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणाला नागरिकांनी पकडून चोप दिला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( A youth who filmed a video of urinating in a toilet was caught and beaten up by citizens. A case has been registered against him.)
मंगेश जवाहिरे (३५) याच्यावर अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी सात वाजता हा प्रकार घडला. कोथरूड परिसरातील असलेल्या एका लॉन्स मध्ये एक नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात होतं. यावेळी एक जण स्वच्छतागृहात व्हिडिओ काढत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. यावेळी पळून जात असलेल्या आरोपीला तेथील कामगारांनी पकडले आणि चोप दिला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल तपासला असता तर त्याने महिलांचा नव्हे तर पुरुषांच्या स्वच्छतागृहात लघुशंका करणाऱ्याचा व्हिडिओ काढला असल्याचे दिसून आले. याबाबत लॉन्समधील एका कामगाराने पोलिसात फिर्याद दिली.