विशेष प्रतिनिधी
पुणे : सेतू कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या संगणक ऑपरेटर दोन महिलांनी दाखल देण्यासाठी 400 रुपयांची लाच मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी यांना पकडले आहे. ( Two women computer operators working on contract basis in the Setu office had demanded a bribe of Rs 400 for the filing. After receiving a complaint to the ACB, the Anti-Corruption Department has laid a trap and caught the accused.)
याप्रकरणी भ्रष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियमान्वये बंडगार्डन पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी वंदना दिनेश शिंदे (वय 50), जयश्री रोहिदास पवार (वय 45) यांच्याविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारदाराने हवेली अप्पर तहसील कार्यालयातील सेतू कार्यालायत भूमीहिन दाखल मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता. सेतू कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या संगणक ऑपरेटर वंदना शिंदे आणि जयश्री पवार यांनी दाखल देण्यासाठी त्यांच्याकडे 500 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत 400 रुपये देण्याचे मान्य करुन तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार केली.
त्यानंतर सेतू कार्यालयात एसीबीने सापळा लावून दोघींना तक्रारदाराकडून 400 रुपयांची लाच घेताना पकडले. दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे पुढील तपास करत आहेत.