विशेष प्रतिनिधी
मुंबई : अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचेही निधन झाले. वाहिनी अपर्णा महाडिक यांच्या आठवणी जागवत मंत्री आदिती तटकरे यांनी शोकाकुल कुटुंबाला आधार देणारी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
( Aditi Tatkare recalls memories of Aparna Bahiniwho died in a plane crash)
आदिती तटकरे यांनी म्हटले आहे कि , “अहमदाबाद येथील विनाशकारी विमान अपघातात निधन झालेली माझी वहिनी, एअर इंडियाच्या केबिन क्रू अपर्णा महाडिक यांच्या दुःखद निधनाबद्दल मी खूप दुःख व्यक्त करते. काही दिवसांपूर्वीच, आम्ही सगळे एकत्र हसत होतो, बोलत होतो, आनंदी क्षण साजसे करीत होतो. आयुष्य किती क्षणभंगुर आहे, त्यासाठी प्रत्येक क्षणांचा आनंद घ्यायला हवा, असे आम्ही बोलत होतो. इतक्या लवकर, ते शब्द खरे ठरतील, असे आम्हाला वाटले नव्हते. या सगळ्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती”.
अपर्णा वहिनी त्यांच्या समर्पण, नम्रता आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जात. त्यांच्या अकाली निधनाने आमच्या कुटुंबातील केवळ एक प्रिय सदस्यच नाही तर एक दृढनिश्चयी आणि स्वावलंबी महिला देखील हिरावून घेतली आहे.”
“आमच्या शोकाकुल कुटुंबातील आत्या आणि मामा (श्रीमती सुलभा आणि श्री. यशवंत महाडिक), माझा आत्येभाऊ अमोल महाडिक आणि लहान अमायरा आणि अपर्णा वहिनीची आई आणि बहीण, ज्यांचे खूप जास्त नुकसान झाले आहे, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”