देशभरात लागू झालेल्या GST 2.0 करसुधारणांमुळे अनेक FMCG . कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत लक्षणीय घट करायला सुरुवात केली आहे. या किमती कमी झाल्याने ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी व्यवहाराच्या पातळीवर ‘सुट्टे पैसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रसिद्ध Parle‑G बिस्किटांचा ₹5 चा पॅक आता ₹4.45 मध्ये मिळू शकणार आहे. पण उरलेले सुट्टे पैसे देणार कोण? अशाच प्रकारे ₹2 च्या शॅम्पूचे सॅशे आता ₹1.77 ला मिळतील आणि ₹1 ची टॉफी केवळ 88 पैशांना उपलब्ध होणार आहे. मात्र अशा किंमतींमुळे ग्राहक आणि दुकानदार दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
किमतीत झालेल्या काही प्रमुख बदलांची यादी:
- Parle‑G बिस्किट्स (₹5) → ₹4.4
- ₹1 चॉकलेट / टॉफी → ₹0.88
- ₹2 शॅम्पू सॅशे → ₹1.77
- Lux साबण (100 ग्रॅम) → ₹35 वरून ₹30
- Dove शॅम्पू (340 मि.ली.) → ₹490 वरून ₹435
- Amul बटर (100 ग्रॅम) → ₹62 वरून ₹58
- Amul तूप (1 लिटर) → ₹650 वरून ₹610
- पनीर (200 ग्रॅम) → ₹99 वरून ₹95
- छोटा आइसक्रीम पॅक (₹10) → ₹9
- टोमॅटो प्युरी (200 ग्रॅम) → ₹27 वरून ₹25
या किंमतीत कपात तर होणार आहे, परंतु व्यवहार करताना अर्धे पैसे, 12 पैसे, 23 पैसे अशा तुटक्या रक्कमांची देवाण-घेवाण सामान्य विक्रेत्यांसाठी आणि ग्राहकांसाठीही त्रासदायक ठरणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी ग्राहकांना UPI पेमेंट करण्यास सांगितले जाईल किंवा उरलेले पैसे एखाद्या चॉकलेटमधून परत दिले जातील काही दुकानदार मात्र किंमत गोल करत ग्राहकांकडून पुन्हा जुनी रक्कम घेतील जे गैरवर्तन मानले जाईल .
काही कंपन्यांची ‘मॅजिक प्राइस पॉइंट’ टिकवण्याची खेळी
GST लागू होण्याआधी काही कंपन्यांनी कराचा भार उत्पादनात समाविष्ट करूनही पारंपरिक किंमत जशीच्या तशी ठेवण्यासाठी उत्पादनाचं वजन कमी केलं होतं. म्हणजे ₹5 किंमत कायम ठेवायची, म्हणून वस्तूचं वजन कमी करण्यात आलं. आता कर कमी झाल्यानंतर त्या कंपन्यांसमोर दोनच पर्याय आहेत – किंमत आणखी कमी करायची की पुन्हा वजन वाढवायचं. त्यामुळे कंपन्या आता पुढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अपेक्षित उपाययोजना?
- डिजिटल व्यवहारांचा वापर अधिक प्रमाणात करणे.
- कंपन्यांनी पुन्हा राउंड फिगर किंमतीसाठी उत्पादन पॅकेजिंग समायोजित करणे.
- ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये व्यवहारासाठी स्पष्ट नियमांची गरज.