विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने २२ फेब्रुवारी तारखेपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. रमेश केरे पाटील यांनी ही माहिती दिली.
केरे पाटील म्हणाले, मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाची सुरुवात संभाजी नगर क्रांती चौकातून करणार आहोत. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार आहोत. मराठा क्रांती ठोक मोर्चा हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहे . २२ तारखेपासून हे आंदोलन सुरू होईल. मराठा क्रांती मोर्चा ठोक मराठा च्या वतीने हे आंदोलन होईल. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कारावे लागेल हे सांगण्यासाठी हे आंदोलन असेल. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी प्रत्येक नेत्याच्या घरी जाऊन भूमिका घेतलेली आहे. सरकार कुठे चुकते हे सांगण्यासाठी हा मोर्चा असेल
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी लढणारे आक्रमक नेते मनोज जरांगे पाटील यांनी १५ फेब्रुवारीपासून राज्यभरात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथून या आंदोलनाची सुरुवात होणार असून, त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यात पसरवले जाईल. जरांगे पाटील म्हणाले आहेत.
22 फेब्रुवारी ते 22 मार्चपर्यंत गाठी भेटी नियोजन करणार, राज्यातील प्रत्येक गावातील अडचण आम्हाला समजायला हवी. 22मार्चपर्यंत आम्हाला भेटायला या असे आवाहन त्यांनी केले होते. आता यापुढील लढाई समोरा समोर असेल. लोकशाही मार्गाने सगळं केलं, गोरगरिबांना त्रास देता, आता तुमचे नाटकं बस. आता निषेध बंद. आता नीट रट्टे देणार. यांची माज मस्ती उतरवणार. आधी चूक आम्ही करणार नाही. मुंबई आंदोलनाची तारीख जाहीर करू. आता आम्ही तिथून उठणार नाही, आता कायम मुंबईत बसणा, असेही ते म्हणाले होते