विशेष प्रतिनिधी
मुंबई : मला अर्थसंकल्पाच्या निमित्ताने राज्याला आर्थिक शिस्त लावायची आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मात्र जे पात्र आहेत त्यांनीच या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अजित पवारांनी केले.
महायुती सरकारने सुरु केलेली लाडकी बहीण योजना ही विधानसभा केलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दर महिना १५०० रुपये रक्कम जमा करण्यात आली. म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर जर सत्ता आली तर लाडकी बहीण योजनेच्या हफ्ता २१०० रुपये करु असे आश्वासन दिले होते. गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार लाडक्या बहिणींना दिलेली रक्कम परत घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याने ही योजना बंद केली जाईल, अशी चर्चाही आहे. मात्र पात्र महिलांसाठी लाभ मिळतच राहतील, अपात्र महिलांना याचा लाभ दिला जाणार नाही असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले आहे.
लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा आमच्याकडे मर्यादित वेळ होता. त्यामुळे आम्हाला बहिणींचे आधार कार्ड लिंक करता आले नाहीत. पण आता आम्ही खरोखर ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना याचा लाभ मिळणे आवश्यक आहे, त्या दृष्टीने आम्ही पावलं उचलत आहोत. पण या योजनेतील महिलांकडून पैसे परत घेण्याचा अजिबात विचार नाही, असेही अजित पवारांनी म्हटले आहे.
पवार म्हणाले, माझ्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्त्वाचा असतो. कॅबिनेट, प्री कॅबिनेट असते. आता अर्थसंकल्प सादर करायचा आहे. उद्या शिवजयंती आहे. त्यामुळे उद्या कार्यक्रम घेतोय. उद्या शिवनेरीला मी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे सकाळी सातला जाणार आहोत आणि नतमस्तक होणार आहोत. आमचा शिवस्वराज्य सप्ताह आहे.