विशेष प्रतिनिधी
पुणे : अजित पवारांनी उपस्थित पत्रकारांवर बंदूक रोखत “महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर बघा”, असे विधान केले अन् उपस्थितांमध्य एकच हशा पिकला. हातात एके 47 रायफल घेऊन हातात अजित पवारांची ही मिश्किल टिपण्णी चर्चेचा विषय बनली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यानंतर त्यांनी चाकणच्या निबे उद्योग समूहाला भेट दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी हातामध्ये एके 47 बंदूक हातात घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेम लावण्याचा प्रयत्न केला. अजित पवार म्हणाले की, “आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “आता एवढंच छापतील.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हातात एके४७ घेतल्याचे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही दिसत आहेत.
अजित पवार चिखली येथील कार्यक्रमातही पत्रकारांवर चांगलेच घसरले होते. काहीही बातम्या दाखवतात. एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर रेड्याचे शिंग पुरले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस तेथे राहायला जात नाहीत. परवा तर बातमी दिली वर्षा बंगला पाडणार आहेत. अरे जरा राज्याचे हित कशात आहे पहा ना. मुख्यमंत्र्यांनी दावस ल जाऊन 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणली. तरुण-तरुणींना काम देण्यासाठी ते प्रयत्न करतायेत . आम्ही सगळेजण त्यांना साथ देतोय. पण त्याच्या ऐवजी अशा बातम्या लावायच्या. म्हणे दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही. अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा काढला पाहिजे?
मुख्मयमंत्री वर्षावर कधी जातील, याच्याशी तुमचं काय देणंघेणं’, असं म्हणत अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली आहे. सकाळचा भोंगा म्हणत अजित पवार यांना नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘एकनाथ शिंदेंनी बंगला सोडल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस वर्षावर जात का नाहीत? यांना काय घेणं-देणं मुख्यमंत्र्यांनी कधी जायचं आणि कधी नाही ते….इतकंच नाहीतर वर्षा बंगला पाडून तिथे नवी बिल्डिंग बांधायची असं म्हणतात.. मुख्यमंत्र्यांच्या लेकीची दहावीची परीक्षा आहे. त्यामुळे तिने सांगितलं परीक्षा झाल्यावर जाऊ’, असं अजित पवार यांनी म्हणत संजय राऊत यांना फटकारले होते.