विशेष प्रतिनिधी
पुणे : शेवटी तो आपला बळीराजा आहे. काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? मनात ठेवायच्या असा सल्ला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. ( Ajit Pawar pricked the ears of Agriculture Minister Manikrao Kokate saying it goes against him.)
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी क्षेत्राबाबत केलेल्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य होता कामा नये. माणिकराव कोकाटे यांना अजून सवय नाही मनात ठेवायची. त्याच्यामुळं असं होत आहे. पण ते मला जास्त महागात पडते असेही अजित पवार म्हणाले.
कृषी खात्याने खूप चांगलं काम केलं आहे. नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत. जसे जसे प्रस्ताव येतील त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असेही अजित पवार म्हणाले. अचानक पाऊस आल्यामुळं या समस्या निर्माण झाल्या आहेत. कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. बजेटमध्ये तरतूद आहे मदत केली जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचारीही घेत असल्याचे आढळून आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्यावेळेस ही योजना आली त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही. लगेच निवडणुका आल्या त्यामुळं तपासण्या करण्यासाठी वेळ मिळाला नाही. ज्यांना गरज आहे त्यांनीच याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले होते. मात्र, आता दिलेले पैसे तर परत घेता येणार नाहीत. यावर नक्कीच मार्ग काढू. आता कशाला कारवाई करायला सांगताय? मान्य आहे चुकलं, त्यांनी नको होतं करायला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी सगळे आमदार मला भेटले होते. त्यांची तिथं काम होत नव्हती. अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे. त्याबद्दलची अधिक माहिती घेत आहे. त्यांनी स्वतः मला भेटून तक्रारी केल्या होत्या. ते आमदार अस्वस्थ होते ही गोष्ट खरी आहे. सगळेच आमदार गेल्यावर पक्षांतर बंदी कशी होईल ,?
शस्त्र परवानाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, याची माहिती घेईल मी.लायसन द्यायचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करायचा पण आहे. कुणाकुणाला लायसन्स दिले आहे याची माहिती घेऊन त्यांना खरंच गरज आहे का? हे तपासले जाईल असे अजित पवार म्हणाले.