विशेष प्रतिनिधी
बारामती : राज्यात लक्ष वेधून घेतलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनेलने 21 पैकी 20 जागा जिंकत
एकतर्फी विजय मिळवला आहे. सहकार बचाव पॅनेलच्या वाट्याला पॅनलप्रमुख चंद्रराव तावरे यांच्या रूपाने केवळ एक जागा आली असून, शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलला एकही जागा मिळाली नाही. ( Ajit Pawars unilateral victory over Malegaon Cooperative Sugar Factory a crushing defeat for Sharad Pawars panel)
माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची ठरली. अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलला चंद्रराव आणि रंजन तावरे यांच्या सहकार बचाव पॅनेलने जोरदार टक्कर दिली. सांगवी गटातून चंद्रराव तावरे विजयी झाले असून, विरोधी गटातील ते एकमेव उमेदवार ठरले. त्यांनी अजित पवारांच्या विरेंद्र तावरे यांचा पराभव केला.
या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन तावरे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.रंजन तावरे यांनी पराभव स्वीकारत अजित पवारांवर टीका केली. हा जनशक्तीविरोधात धनशक्तीचा विजय असल्याचा आरोप त्यांनी केला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी एकहाती विजय मिळवला आहे. काट्याच्या लढतीत अजित पवारांच्या पॅनेलचे 20 उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. शरद पवार यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला.
अजित पवार यांच्या निलकंठेश्वर पॅनेलने मोठे यश मिळविले. स्वतः अजित पवारही मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेत.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा संपूर्ण निकाल
अजित पवार (नीळकंठेश्वर पॅनेल) विरुद्ध चंद्रावर तावरे (सहकार बचाव पॅनल)
अजित पवार गट श्री निळकंठेश्वर पॅनलचे 20 उमेदवार विजयी….
तावरे गट सहकार बचाव शेतकरी पॅनलचा केवळ एक उमेदवार विजयी…..
ब वर्ग प्रतिनिधी
अजित पवार यांना मिळालेली मते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 91
भालचंद्र देवकाते यांना मिळालेली मते (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 10
यात अजित पवार 91 मतांनी विजयी
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
रतनकुमार साहेबराव भोसले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8670
बापूराव आप्पा गायकवाड (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7183
यात 1487 मताने रतनकुमार भोसले विजयी
इतर मागासवर्गीय प्रवर्ग
नितीन वामनराव शेंडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8494 मते
रामचंद्र कोंडीबा नाळे (सहकार बचाव पॅनल) 7341
यात 1153 मतानी नितीन शेंडे विजयी.
भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग
विलास ऋषिकांत देवकाते(श्री निळकंठेश्वर पॅनल)
सूर्याजी तात्यासो देवकाते (सहकार बचाव शेतकरी पॅनल)
यात 2227 मतांनी विलास देवकाते विजयी
महिला राखीव मतदारसंघ
संगीता बाळासाहेब कोकरे(श्री निळकंठेश्वर पॅनल) 8440
ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुले(श्री निळकंठेश्वर पॅनल) 7576
( अजित पवार गटाच्या या दोघीही महिला विजयी)
राजश्री बापूराव कोकरे(सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7485 (अवघ्या 91 मतांनी राजश्री कोकरे यांचा पराभव)
माळेगाव गट क्रमांक एक सर्वसाधारण ऊस उत्पादक
शिवराज जाधवराव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8612
बाळासाहेब तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल)7942
राजेंद्र बुरुंगले ( श्री निळकंठेश्वर पॅनल) 8116
(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)
रंजनकुमार शंकरराव तावरे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 7353
संग्रामसिंह काटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6701
रमेश गोफणे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6302
पणदरे गट क्रमांक 2
तानाजी कोकरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8495
योगेश जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8635
स्वप्नील जगताप (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7933
(वरील तीनही उमेदवार विजयी आहेत)
रोहन कोकरे (सहकार बचाव पॅनल) 7083
रणजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6134
सत्यजित जगताप (सहकार बचाव पॅनल) 6232
सांगवी गट क्रमांक 3
गणपत खलाटे (श्री निळकंठेश्वर पॅनल)8543
चंद्रराव तावरे (सहकार बचाव पॅनल) 8163
विजय तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7882
(सांगवी गटातून सहकार बचाव पॅनलचे चंद्राराव तावरे विजयी…. तर अजित पवार गटाचे गणपत खलाटे आणि विजय तावरे विजयी झाले आहेत.)
रणजित खलाटे (सहकार बचाव पॅनल)7224
विरेंद्र तावरे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7289
संजय खलाटे (सहकार बचाव शेतकरी पॅनल) 6154
खांडज शिरवली गट क्रमांक 4
प्रताप आटोळे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8328
सतीश फाळके (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8404
(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)
विलास सस्ते (सहकार बचाव पॅनल) 6436
पोंदकुले मेघश्याम (सहकार बचाव पॅनल) 6422
निरावागज गट क्रमांक पाच
अविनाश देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8640
जयपाल देवकाते (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8051
(वरील दोन्ही उमेदवार अजित पवार गटाचे विजयी)
केशव देवकाते (सहकार बचाव पॅनल)6436
राजेश देवकाते (सहकार बचाव पॅनल)6499
बारामती गट क्रमांक सहा
नितीन सातव (श्री निळकंठेश्वर पॅनल) 7858
देविदास गावडे (श्री निळकंठेश्वर पॅनल) 8028
(बारामती गटातून अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी)
नेताजी गवारे (सहकार बचाव पॅनल) 7021
गुलाबराव गावडे (सहकार बचाव पॅनल) 7080