विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोला आणि अमरावती जिल्हा हे बांग्लादेशींना बोगस नागरिकत्व प्रमाणपत्र मिळण्याचे केंद्र झाल्याचा आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.
किरीट सोमय्यांनी आज अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घोतलीय. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात ही भेट झाली. अकोला जिल्ह्यातील सातही तालूक्यात 15 हजार 845 बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्या यांनी गंभीर आरोप केला. याआधी किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांकडे अमरावती, भिवंडी आणि मालेगावात बांग्लादेशींना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला होताय. अमरावती नाशिक, नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना तहसील कार्यालयांतून मोठ्या प्रमाणात बनावट जन्म दाखले दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. याचसंदर्भात आज सोमय्या यांनी घेतली नागपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्हाधिकार्यांची भेट घेतलीय. महाविकास आघाडीने विधानसभेत वोट जिहादसाठी हे घडवून आणण्याचा आरोप त्यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारने आपल्या पाच वर्षांपूर्वीच्या नितीमध्ये बदल करत बांध आणि ‘बैकवाटर’ परिसरांतील दारू विक्री आणि पिण्यावरील बंदी उठवली आहे. २०१९ मध्ये शासकीय आदेशाद्वारे या परिसरांमध्ये दारू विक्री आणि...
Read moreDetails