विशेष प्रतिनिधी
केज :संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्यासोबत धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना या प्रकरणाची सुनावणी ज्यांच्यासमोर सुरू आहे ते जिल्हा व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश सुधीर भाजीपाले दिसत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ( Anjali Damania’s serious allegations,
Photo of the judge playing Holi with the suspended police sub-inspector in the Santosh Deshmukh murder case)
केज येथील फोटोच दमानिया यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकले आहेत. दमानिया यांनी म्हटले आहे की हे फोटो तपासा आणि आधी खात्री करा. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे निलंबित पोलीस उपनिरिक्षक राजेश पाटील व याच हत्याकांडामुळे सक्तीच्या रजेवर पाठवलेले पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे धुळवडीला रंगाची उधळण करुन आनंद साजरा करताना दिसत आहेत पण कोणाबरोबर ?
संतोष देशमुख हत्याकांडाची सूनावणी करणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या सोबत रंगाची उधळण करताना दिसत आहेत
आरोपीला वाचवणारे हे निंलबित आधिकारी यांच्या सोबत केस चालू असताना, जज होळी खेळत असतील तर हे खूप चुकीचे आहे.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने सरकारी वकील म्हणून ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. केज येथील जिल्हा व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मार्च रोजी होणार आहे.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक बाबुराव कराड आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू महादेव चाटे यांच्यासह सराईत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन चंद्रभान घुले आणि प्रतीक भीमराव घुले, सुधीर ज्ञानोबा चाटे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे आणि फरार असलेला कृष्णा शामराव आंधळे यांच्याविरोधात सीआयडी आणि एसआयटी यांनी २८ फेब्रुवारी रोजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.