विशेष प्रतिनिधी
पुणे : दारू आणि पैशात अडकल्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ चा पराभवझाला अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. (Senior social worker Anna Hazare has criticized that ‘AAP’ lost in the Delhi assembly elections due to being involved in alcohol and money.)
मी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे मतमोजणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव स्पष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकेकाळचे गुरु ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी (आप) यांच्यावर कठोर टीका केली आहे. राजकारणात उमेदवारांचे चारित्र्य, चांगल्या विचारसरणी आणि निष्कलंक प्रतिमेचे महत्त्व सांगत केजरीवाल यांच्या पराभवाची कारणममांसा केली आहे.
हजारे म्हणाले, “मी बर्याच काळापासून सांगत आलो आहे की, निवडणूक लढवताना उमेदवाराचा चारित्र्य, चांगले विचार आणि प्रतिमेवर कोणताही डाग नसावा. पण, ‘आप’ला ते साध्य झाले नाही. ते दारू आणि पैशांमध्ये अडकले. त्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा डागाळली आणि त्यांना निवडणुकीत कमी मते मिळत आहेत.”
केजरीवाल यांच्यावर टीका करताना हजारे म्हणाले, “लोकांनी पाहिले की ते चारित्र्याबद्दल बोलतात, पण दारूमध्ये गुंततात. राजकारणात आरोप होतात, आणि नेत्यांनी आपली निर्दोषता सिद्ध करावी लागते, असेही त्यांनी नमूद केले.
आपच्या स्थापनेपासूनच हजारे यांनी पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. “जेव्हा एक बैठक झाली, तेव्हा मी पक्षाचा भाग होणार नाही असे ठरवले – आणि त्या दिवसापासून मी दूर राहिलो आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.