विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. रागाच्या भरात मी माफी मर्यादा विसरलो आणि ब्राह्मण समाजाला बरंवाईट म्हणालो, असे त्याने म्हटले आहे. ब्राह्मणावर मी मुतीन… काही प्रॉब्लेम? अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर दिल्याने अनुराग कश्यप वादात सापडला होत. ( Anurag Kashyap publicly apologizes to the Brahmin community)
अनुरागने सोशल मीडियावर एका ट्रोलरला उत्तर देताना ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर अनेकांकडून त्याच्यावर जोरदार टीका झाली. इतकंच नव्हे तर मुंबई पोलीस आयुक्तांकडे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याता आली होती. ब्राह्मणांबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर अनुरागने याआधीही माफी मागितली होती. परंतु आता पुन्हा एकदा त्याने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहिले आहे.
अनुराग कश्यपने म्हटले आहे की, मी रागाच्या भरात एकाला उत्तर देताना माझी मर्यादा विसरलो आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाला वाईट म्हणालो. असा समाज, ज्याचे लोक माझ्या आयुष्यात कायम राहिले आहेत. आजसुद्धा आहे आणि त्यांचे माझ्या आयुष्यात बरेच योगदान आहे. आज ते सर्वजण माझ्यामुळे दुखावले गेले. माझे कुटुंबीयसुद्धा दुखावले आहेत. अनेक बुद्धिजीवी लोक, ज्यांचा मी आदर करतो ते माझ्या रागाने आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीने दुखावले आहेत. मी स्वत: तसं वक्तव्य करून स्वत:च्याच मुद्द्यावरून भरकटलो.
मी या समाजाची मनापासून माफी मागतो. ज्यांना मला तसं म्हणायचं नव्हतं. परंतु रागाच्या भरात एकाच्या घाणेरड्या टिप्पणीचं उत्तर देताना मी तसं लिहिलं. मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबीयांची आणि त्या समाजाची, माझ्या बोलण्याच्या पद्धतीसाठी, अभद्र भाषेसाठी माफी मागतो. यापुढे असं पुन्हा होणार नाही, यावर मी काम करेन. माझ्या रागावर काम करेन आणि एखाद्या मुद्द्याबद्दल बोलायचं असेल तर योग्य शब्दांचा वापर करेन. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.
सोशल मीडियावर टीका, ट्रोलिंग आणि कायदेशीर कारवाईच्या मागणीनंतर यापूर्वीही अनुरागने इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत माफीनामा जाहीर केला आहे. मात्र, त्याने स्पष्ट केलं की, ही माफी संपूर्ण पोस्टसाठी नसून फक्त त्या एका ओळीसाठी आहे, जी त्याच्याच मते ‘आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट’ काढून वापरली जात आहे.
हा सगळा वाद सोशल मीडियावर झाला.एका सोशल मीडिया वापरकर्त्याने अनुराग कश्यपला उद्देशून लिहिलं होतं :ब्राह्मण तुमचे बाप आहेत. जितकं तुम्ही त्यांच्याशी वाकडं घ्याल, तितकंच ते तुम्हाला जाळतील.त्याला उत्तर देताना अनुराग कश्यपने लिहिलं :”ब्राह्मणावर मी मुतीन… काही प्रॉब्लेम?”
या विधानावरून सोशल मीडियावर मोठा गदारोळ उठला. अनेकांनी त्याला जातीद्वेष पसरवणारा, महिलांविषयी असंवेदनशील आणि सामाजिक तणाव निर्माण करणारा ठरवलं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
अनुरागने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे: ही माझी माफी आहे. त्या संपूर्ण पोस्टसाठी नाही, तर फक्त त्या एका ओळीसाठी आहे जी आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट काढून द्वेष पसरवण्यासाठी वापरली जात आहे. कोणतंही विधान माझ्या कुटुंबाला, मुलीला, मित्रांना मिळणाऱ्या बलात्कार आणि खुनाच्या धमक्यांपेक्षा मोठं नाही. बोललेले शब्द परत मागे घेतले जाऊ शकत नाहीत आणि मी ते घेणारही नाही.माझं कुटुंब कधीच काही बोलत नाही. म्हणूनच, जर माझ्याकडून माफी हवी असेल, तर घ्या – माझी माफी.”
प्रतिक गांधी आणि पत्रलेखा यांच्या ‘फुले’ सिनेमाच्या सेन्सॉर वादात अनुराग कश्यपने उडी घेतली होती. जातव्यवस्थेच्या वास्तवावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने अडथळे आणले, यावरून तो संतापला होता. याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाविषयी वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे.
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर #BoycottAnuragKashyap ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी त्याच्या विधानाला जातीद्वेष पसरवणारे ठरवत त्याला कठोर कारवाईची मागणी केली. भाजपचे नेते आणि ‘बिग बॉस’ फेम तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी देखील अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती.