विशेष प्रतिनिधी
मुंबई : बदलापूर मधील एका शाळेत दोन छोट्या मुलींवर लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर मध्ये मृत्यू झालेला. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या पोलीस एन्काऊंटर बाबत एक धक्कादायक माहिती समोर आली. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. ठाणे दंडाधिकारी चौकशी अहवालात या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं न्यायालयाने नोंदवले. तसेच यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख देखील केला आहे. (Badlapur rape accused Akshay Shinde’s encounter is fake! The investigation report claims that five policemen are responsible for this death)
बदलापूर मधील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षाच्या आणि एका सहा वर्षाच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदे यानी अत्याच्यार केला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केलं गेलं आणि पुन्हा दुसऱ्याच दिवशी 13 ऑगस्ट ला आणखी एका दुसऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला. या मुली शाळेत जायला तयार नसल्यानं त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा गंभीर प्रकार उघड झाला. दोन्ही पिडीत मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप या कुटुंबीयांकडून करण्यात आला. याप्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केलं. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या नाहीतर आरोपीला आमच्या अहवाली करा अशी मागणी संतापलेल्या नागरिकांकडून करण्यात आली.
यानंतर या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 रोजी एन्काऊंटर करण्यात आला. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना ही घटना घडली होती. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यांनी एपीआय निलेश मोरे याची सर्विस रेवॉलवर घेउन निलेश मोरे यांच्यावर त्याने तीन गोळ्या फायर केल्या. यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली आणि दोन गोळ्यांचा फायर चुकली. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. रिवाल्वर मधून झाडलेल्या दोन गोळ्या अक्षय शिंदे वर फायर केल्या. यातील एक अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागली होती. मात्र हा सगळा एन्काऊंटर फेक असल्याचं उच्च न्यायालयाच्या अहवालातून समोर आलं. या चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं. या बनावट चकमकीत पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैर पद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असं संबंधित अहवालात नमूद करण्यात आलं.<
/div>
या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे यांच्या हाताचे ठसे रिवाल्वर वर आढळून आलेले नाहीत. मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिवाल्वर हिसकावुन गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र या अहवालामुळे पोलिसांचा पितळ उघड पडलं .पोलिसांच्या आत्मरक्षणासाठी आम्ही अक्षय वर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचं अहवालात म्हटलं. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठाने 20 जानेवारीला खुल्या न्यायालयात या अहवालाचे वाचन केलं. संकलित केलेले साहित्य आणि एफएसएल अहवालानुसार मृताच्या पालकांचे आरोप योग्य आहेत आणि हे पाच पोलीस त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत असं खंडपीठाने म्हटलं.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांच्या सहाय्याने खंड मिठाला माहिती दिली की राज्य कायद्यानुसार कारवाई करेल आणि गुन्हा दाखल केला जाईल. त्याचवेळी कोणत्या तपास यंत्रणेद्वारे प्रकरणाची चौकशी करणार? अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांच्याकडे केली व त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. आरोपीच्या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिसाची वैद्यकीय कागदपत्रे न्यायदंडा अधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आली नसल्याची बाब उघडकीस आली आणि यानंतर खंडपीठाने सीआयडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. व तपास यंत्रणेने तपासात त्रुटी ठेवून स्वतःच तपासाबाबत संशय निर्माण केल्याने न्यायालयाने ताशेरे ओढले