भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) बिहार विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले की, निवडणुका दोन टप्प्यांत पार पडणार आहेत.
पहिला टप्पा मतदान: ६ नोव्हेंबर २०२५
दुसरा टप्पा मतदान: ११ नोव्हेंबर २०२५
निकाल: १४ नोव्हेंबर २०२५
“सोशल मीडियावर चर्चेचा विषय काल का नाही केल्या तारखा जाहीर, २१ लाख महिलांच्या खात्यात १० हजार जमा करायचे होते म्हणून, पाटणा मेट्रोचे उद्घाटन झाले नव्हते म्हणून.”
मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, “बिहारमध्ये पारदर्शक आणि शांततेत निवडणुका घडवण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे.” बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण २४३ जागांसाठी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया EVM आणि VVPAT प्रणालीद्वारे पार पडेल. संपूर्ण राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली असून, केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती सुनिश्चित करण्यात आली आहे. याशिवाय, मतदान केंद्रांवर CCTV आणि वेबकास्टिंगची व्यवस्था ठेवण्यात आली आहे, जेणेकरून निवडणुकीत पारदर्शकता आणि सुरक्षितता राखली जाईल.
२०२० मध्ये बिहारमध्ये तीन टप्प्यांत निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी एनडीएला बहुमत मिळाले आणि नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यंदा पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.
यंदाच्या बिहार विधानसभा निवडणुकीत बेरोजगारी, विकासाच्या योजना, जातीगत समीकरणं, स्थलांतरित मजुरांचे प्रश्न, कृषी सुधारणा, महागाई आणि शिक्षण हेच प्रमुख मुद्दे ठरण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशाचे लक्ष आता बिहारच्या राजकीय रणांगणाकडे खिळले आहे.