मुंबई : देशभक्तिपर चित्रपटांची शान असलेले ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. ( Bollywoods Bharat passes away Manoj Kumar passes away)
काही दिवसांपासून आजारी असलेल्या मनोज कुमार यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
‘भरत कुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोज कुमार हे देशप्रेमाने ओतप्रोत चित्रपटांसाठी प्रसिद्ध होते.
उपकार, पूरब-पश्चिम, क्रांती, रोटी कपडा और मकान यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
त्यांच्या सिनेसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले, ज्यापैकी ‘उपकार’ चित्रपटासाठी त्यांना 1968 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक, कथा आणि संवाद असे चार पुरस्कार मिळाले.
त्यांना 1992 मध्ये पद्मश्री, तर 2016 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टी आणि देशात शोककळा पसरली आहे.