विशेष प्रतिनिधी
पुणे ,: गहुंजे येथील कॅत्व हाउस परिसरात झालेल्या बैठकीदरम्यान एका बांधकाम व्यावसायिकाला तिघांनी मारहाण करून करून जखमी केले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.
( Builder beaten up in Gahunje after argument during discussion)
अतिष जयप्रकाश केसरवानी (वय ४५), अखिलेश जयप्रकाश केसरवानी (वय ४३), संजय चव्हाण (वय ४१, तिघेही रा. सोमवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. महेंद्रकुमार कन्हैयालाल केसरी (वय ४६, रा. बेलमांडो, गहुंजे) यांनी याबाबत शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांची केसरी यांच्यासोबत बैठक होती. बैठकीत अचानक वाद झाल्याने आरोपी अतिष याने फिर्यादीच्या ओठावर अंगठीने मारून जखमी केले. त्यांना पाच टाके पडले. तर इतर दोघांनी शिवीगाळ व धमकी दिली. शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास पोहवा कोकलरे याबाबत अधिक करीत आहेत.