विशेष प्रतिनिधी
पुणे : सिंहगड रस्ता परिसरात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या आई वडिला विरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या हॉटेल आणि बारवर देखील कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलांना दारू विकणारे हॉटेल आणि बार करण्यात सील केले आहेत. ( Case registered against bar owner along with parents of minors who vandalized cars)
सिंहगड रस्त्यावर दारूच्या नशेत अल्पवयीन मुलांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविल्याच्या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलांना दारू विक्री करणारे नशा बार सील केले आहे बार मालक, मॅनेजर, बार काऊंटर, दारू देणार्यासह त्या अल्पवयीन मुलांच्या आई-वडिलांना गुन्ह्यात सह आरोपी केले आहे.
दोन दिवसांपुर्वी दोन अल्पवयीन मुलांसह त्याच्या साथीदारांनी पुण्यातील सिंहगड रोड परिसरात गाड्यांची तोडफोड केली होती.’आम्हीच या भागातील भाई’ म्हणत गोंधळ घालत 20 ते 22 वाहनांची या अल्पवयीन मुलांनी तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला होता.
मद्यप्राशन करत या सगळ्या आरोपींनी तोडफोड केल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांकडून मुलांच्या पालकांसह बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये अल्पवयीन मुलाचे वडिल धर्मा सरोदे (वय 75), दुसर्या एका मुलाची आई तसेच जे.जे. कायदा कलम 77 नुसार नशा बारचे मालक/चालक, तसेच बार मॅनेजर अनिल विनायक सुर्यवंशी, बार काऊंटर विनोद दत्ता कांबळे, दारू विकत घेऊन देणारा कालिदास नायकवाडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.