विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाने विधानपरिषदेसाठी धुळे–नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. ( Chandrakant Raghuvanshi nominated for Legislative Council by Shiv Sena Shinde faction)
शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला एकच जागा आली आहे. यामध्ये रघुवंशी यांच्यासोबतच शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचीही नाव चर्चेत होती. अखेर चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
विधानपरिषदेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली होती. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे.
रघुवंशी यांनी 2019 मध्ये काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे प्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रघुवंशी यांना विधान परिषदेचा माध्यमातून आमदारकी बहाल करण्याचा शब्द दिला होता. त्यांचे नाव राज्यपालांकडे पाठविले होते. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांची नियुक्तीच केली नाही. त्यामुळे रघुवंशी यांना आमदारकी मिळाली नाही. आता रघुवंशी यांना आमदार करण्याचा शब्द एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केला आहे.
रघुवंशी कुटुंबाच्या दोन पिढ्या काँग्रेसमध्येच होत्या. चंद्रकांत रघुवंशी यांचे वडील बटेसिंहदादा रघुवंशी यांनाही विधान परिषदेतून वेळोवेळी आमदारकी मिळाली. त्यानंतर काँग्रेसने धुळे-नदुरबार विधान परिषदेतून चंद्रकांत रघुवंशी यांना दोन वेळेस व राज्यपाल नियुक्त कोठ्यातून एकदा असे तीन वेळेस आमदारकी दिली होती.
2019 मध्ये विधान सभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचा विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी मातोश्री वर जाऊन शिवबंधन बांधले. रघुवंशी यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. मात्र उध्दव ठाकरे तो पूर्ण करू शकले नव्हते