विशेष प्रतिनिधी
पुणे : दहशतवाद्यांतील एकाने बोलावून घेतलं आणि म्हणाला अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ? त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या. आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजाण म्हटली. पण तरीही त्यांनी आमच्या माणसांना मारून टाके असा अंगावर शहरे आणणारा अनुभव पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नीने सांगितला. (Chanted AzaanRemoved BindisYet They Were Shot)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात पुण्याचे संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश होता. गुरुवारी पहाटे या दोघांचे पार्थिव त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले.यावेळी कौस्तुभ गनबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या,’तिथे गेटवर एक मुस्लिम होता, तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुक केली आहे ? त्याला सुद्धा पुढे करून गोळ्या घातल्या. आमच्या घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर घ्यायला आले. आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली, सैन्य दलाची देखील मदत मिळाली पण तोपर्यंत उशिरा झाला होता आमची माणसं गेली होती.