विशेष प्रतिनिधी
मुंबई : तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या ड्रग्स विरोधातील लढाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. ड्रग्स संदर्भात झिरो टॉलरन्स पॉलीसी असणार आहे. या प्रकरणात कोणताही पोलीस कर्मचारी किंवा कोणत्याही रँकमधील अधिकारी सापडला तरी त्याचे थेट निलंबन करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ( Chief Minister’s tough stance in the fight against drugs, direct suspension of police personnel or officers if found)
महाराष्ट्र पोलीस परिषदेत झालेल्या चर्चेची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, देशात नवीन तयार झालेल्या तिन्ही कायद्यांचे आणि सायबर प्लॅटफॉर्म सादरीकरण झाले. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आरोपपत्र जलद गतीने न्यायालयासमोर वेळेत कसे जाईल त्यावर चर्चा झाली. ड्रग्स संदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. ड्रग्स संदर्भात झिरो टोलरन्सी पॉलीसी असणार आहे. या प्रकरणात कोणताही पोलीस कर्मचारी किंवा कोणत्याही रँकमधील अधिकारी सापडला तरी त्याचे थेट निलंबन करण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
उद्योगांना कोणताही त्रास होऊ नये. तसेच महिला अत्याचार संदर्भात वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे हा प्रयत्न असेल. त्याचे ट्रॅकींग आम्ही करत आहोत.नवीन कायद्यात एखाद्या गुन्ह्यात लोकांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याची तरतूद तयार केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. सहा महिन्यांत लोकांचा मुद्देमाल परत गेला पाहिजे. म्हणजे पोलिस ठाणे रिकामी होतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.