वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी Tata Motors ला शेअर बाजारात मोठा फटका बसला आहे. कंपनीचा शेअर 2.83% नी घसरून ₹663.60 वर बंद झाला. ही घसरण युरोपमधील उपकंपनी Jaguar Land Rover (JLR) वर झालेल्या गंभीर सायबरहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झाली.
या हल्ल्यामुळे JLR च्या UK कारखान्यांमधील उत्पादन १ ऑक्टोबर २०२५ पर्यंत ठप्प राहणार असून, सप्लाय चेन आणि IT सिस्टीम पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. विश्लेषकांच्या मते, या घटनेमुळे कंपनीला सुमारे ₹21,000 कोटींचे नुकसान होऊ शकते. धक्कादायक बाब म्हणजे या नुकसानावर कोणतेही विमा संरक्षण नसल्याचे वृत्त समोर आले आहे.
महत्त्वाचे आकडे:
-
सध्याचा शेअर भाव: ₹663.60
-
मागील बंद भाव: ₹682.45
-
एकूण घसरण: -2.83%
-
इंट्राडे उच्चांक ₹675.00
-
इंट्राडे नीचांक: ₹655.30
-
ट्रेडिंग व्हॉल्युम 2.14 कोटी शेअर्स
-
बाजारमूल्य: ₹2.44 लाख कोटी
-
52 आठवड्यांचा उच्चांक: ₹1,000 (सप्टेंबर 2024)
-
YTD घसरण: -29.1%
BSE ने स्पष्टीकरण मागितले
विमा संरक्षणाच्या अभावासंदर्भातील बातम्यांवर BSE ने Tata Motors कडून अधिकृत स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आणखी अनिश्चितता वाढली आहे.
कमकुवत कामगिरी
ऑगस्ट 2025 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री 3% ने घटली, तर व्यावसायिक वाहनांची विक्री 10% ने वाढली. तरीही, Q1 FY26 मध्ये कंपनीचा महसूल 2.5% ने घसरून ₹1,04,407 कोटींवर आला आहे.
गुंतवणूकदारांची चिंता
गेल्या वर्षभरात शेअरने उच्चांक ₹1,000 वरून थेट ₹663 पर्यंत घसरल्याने गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. काही ब्रोकरेज संस्थांनी या शेअरसाठी “Sell” रेटिंग दिले आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, EV गुंतवणूक, स्थिर ROE आणि मजबूत ब्रँडमुळे कंपनी दीर्घकालीन काळात स्थिर होऊ शकेल; पण सायबरहल्ल्यामुळे अल्पकालीन अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.