विशेष प्रतिनिधी
पुणे: डोळ्यासमोर वडलांची हत्या झाली. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे होते, त्यावरती रक्ताचे शिंतोडे पडले होते,. त्याच कपड्यांनी आसावरीने वडील संतोष जगदाळे यांना अग्नी दिला. यावेळी सगळेच सुन्न झाले होते. (Daughter Performs Last Rites for Father Wearing Clothes Stained with His Blood)
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या हल्ल्यात संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. दरम्यान आज दोन्ही मित्रांवरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दोघे जण लहानपणापासूनचे फार जवळचे मित्र होते. दोघांचेही पार्थिव त्यांच्या पुण्यातील घरी आणण्यात आले. पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संतोष जगदाळे यांची हत्या त्यांची मुलगी आणि पत्नीच्या डोळ्यासमोर करण्यात आली. आसावरीच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपल्यामुळे संतोष जगदाळे यांच्या मुलीला मोठा धक्का बसला. संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी केली होती. संतोष जगदाळे यांच्या मित्रांना देखील अश्रू अनावर झाले आहेत. सकाळपासूनच संतोष जगदाळे यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या घरी मोठी गर्दी केली आहे.
हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे होते, त्यावरती रक्ताचे शिंतोडे पडले होते, त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी दिला आहे. संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले .
आसावरीसोबत तिचे वडील संतोष जगदाळे, आई प्रगती जगदाळे, त्याचसोबत काका कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी संगीता गनबोटे हे काश्मिरमध्ये सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेले होते. यामधील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. जगदाळे कुटुंबीय पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहतात. तर गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेत राहतात. वडील आणि काकांना गमावल्यामुळे आसावरीसोबत त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.