विशेष प्रतिनिधी
पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहील डोंगरे असे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचे नाव आहे.
( Deadly attack on Shivshahi rape case
Datta Gade’s lawyer )
१७ मार्चला डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले. मारहाण केल्यानंतर त्यांना घाटात सोडण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. प्राणघातक हल्ल्याचं कारण स्पष्ट झालं असल्याच पोलिसांनी सांगितलं , पुढील तपास पोलीस करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट डेपोमधील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडे कोठडीत आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याच्या वकिलावर आता प्राणघातक हल्ला करण्यात आला. सोमवारी सायंकाळी त्याच्या वकिलाचं हडपसर येथून अपहरण करण्यात आलं. तिथून बोपदेव घाटात नेण्यात आलं. वकिलाला धक्काबुक्कीने मारहाण करत शर्ट फाडला. मारहाण केल्यानंतर त्यांना दिवे घाटात सोडून दिलं. जखमी अवस्थेतच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. आणि फिर्याद नोंदवली नेमके कुणी आणि का हल्ला केला? याचा तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, ऍड. डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.