विशेष प्रतिनिधी
मुंबई : फक्त लग्नाला गेलो म्हणून माझी बदनामी केली जातेय. जर माझ्या पक्षात असे नालायक लोक असतील, तर त्यांची हकालपट्टी केली जाईल. माझा दुरान्वयेही संबंध नाही. असे लोक मला माझ्या पक्षात नकोत, असा संताप वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.( Defamation just for going to a weddingI dont want such worthless people in my party Ajit Pawars anger over Vaishnavi Hagavanes death)
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांचा मुलगा आणि कुटुंबीय आरोपी आहेत. अजित पवार म्हणाले, “वैष्णवीचे लव्ह मॅरेज झाले होते. मी फक्त लग्नाला गेलो. मला फक्त गाडीची चावी द्यायला सांगितले म्हणून मी विचारून ती दिली. स्वखुशीने देताय का, जबरदस्तीने का, हेही विचारले होते. मग यामध्ये माझी बदनामी का केली जातेय? घटनेची माहिती मिळताच मी पिंपरीच्या पोलीस आयुक्तांना फोन केला आणि स्पष्ट निर्देश दिले की, आरोपी कोणताही असो, कडक कारवाई झाली पाहिजे. मृत मुलीचा नवरा, सासू आणि नणंद पोलिस कोठडीत आहेत. सासरा फरार आहे, पण तोही सापडेल. तो कुठे जाणार?”
“प्रेमापोटी लोक लग्नाला बोलावतात, मी गेले नाही तर लोक रुसतात. पण त्यानंतर जर काही वाईट घडले, तर त्यासाठी मला दोषी ठरवणे कितपत योग्य?” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. “फडतूस दादा” असा उल्लेख करत दानवे म्हणाले, “हुंडा या अनिष्ट प्रथेचे उदात्तीकरण करणारे उपमुख्यमंत्री जेव्हा ‘लाडका भाऊ’ म्हणून मान दिला जातो, तेव्हा परिणामी हुंडाबळी घडतात. हा प्रकार दुर्दैवी असून समाजात चुकीचा संदेश जात आहे.