मुंबई │ संतोष देशमुख हत्याप्रकरणी तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. राजीनाम्यानंतरही त्यांनी अधिकृत निवासस्थान असलेला मलबार हिल येथील ‘सातपुडा’ बंगला वेळेत रिकामा केला नाही. त्यामुळे त्यांच्यावर तब्बल ४२ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. ( Dhananjay Munde fined ₹42 lakh for Satpuda bungalow )
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नियमांनुसार १५ दिवसांच्या आत बंगला रिकामा करणे आवश्यक असते. मात्र, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर चार महिन्यांहून अधिक काळ बंगला ताब्यातच ठेवला.
दरम्यान, ५ मे रोजी शासन निर्णय काढून ‘सातपुडा’ बंगला हे नवीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निवासस्थान म्हणून देण्यात यावे, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अद्याप भुजबळ यांचा या बंगल्यात गृहप्रवेश झाला नाही.
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले,
“कोणीतरी तिथे राहत असेल, तर त्याला कसे काढायचे? याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील.”